महत्वाच्या घडामोडी
अंतिम वर्षाच्या परीक्षा ६० टक्के ऑनलाईन आणि ४० टक्के ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार - उदय सामंत            सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ - उध्दव ठाकरे            महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती तीन आठवड्यात सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश            कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकरी स्वतंत्र होणार मात्र विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            रेल्वेतील रिक्त पदं रद्द करण्याची कोणतीही योजना नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण           

Oct 12, 2019
8:04PM

नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यातल्या अनौपचारिक शिखर बैठकीचा आज दुसरा दिवस

आकाशवाणी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातल्या अनौपचारिक शिखर बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून उभय नेत्यांची चर्चा पुढं सुरु होईल. मोदी आणि जिनपिंग यांच्यात काल सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली. विविध राष्ट्रीय विषयांवर तसंच सरकारी धोरणांच्या प्राधान्य क्रमाबाबत अनेक मुद्यांवर सुमारे पाच तास चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
भारत आणि चीन दोन्ही भौगोलिकदृष्ट्या विशाल आणि विविधतेनं संपन्न देश असून, त्यात मूलतत्ववादी विचारसरणीचा प्रसार हा त्यांच्या समृद्ध संस्कृतीला धोका असल्याचं दोन्ही नेत्यांमधे एकमत झालं. अशा प्रकारचे कट्टरतावादी विचार वेळीच रोखले पाहिजे, असंही यावेळी मांडण्यात आलं.
उभयपक्षी व्यापार, संख्या आणि दर्जाने वृद्धींगत करण्यावर यावेळी चर्चा झाली. दोन्ही देशांच्या आर्थिक प्रगतीसाठी मिळून काम करायचं मोदी आणि जिनपिंग यांनी ठरवलं. महाबलीपूरम इथल्या मंदिर संकुलाची दोघांनी एकत्र सफर केली. सांस्कृतिक कार्यक्रम आणि भोजनाचा आस्वाद घेतला. तसंच चीनमधल्या फुजीयन प्रांताबरोबरच्या ऐतिहासिक तमिळी संबंधांना आणि बौद्ध धर्माच्या निमित्ताने भारत-चीनदरम्यान प्रस्थापित झालेल्या संबंधांना या भेटीत उजाळा मिळाला.
या अनौपचारिक भेटीसाठी चीनच्या अध्यक्षांचं काल विशेष विमानाने चेन्नई विमानतळावर आगमन झालं. या सौहार्दपूर्ण स्वागतासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-18 Sep 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 37.0 26.0
मुंबई 32.0 25.0
चेन्नई 33.0 26.0
कोलकाता 35.0 28.0
बेंगलुरू 28.0 21.0