महत्वाच्या घडामोडी
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदार संघांच्या निवडणूकांची मतमोजणी सुरु            नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा            देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९५ लाखांच्या वर            देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सर्वोच्च न्यायालायाचे आदेश            राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार           

Oct 11, 2019
8:23PM

दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात ३ गडी बाद ३६ धावा

आकाशवाणी
पुण्यात गहुंजे स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात, दक्षिण आफ्रिकेनं आज दुसऱ्या दिवसअखेर आपल्या पहिल्या डावात ३ गडी बाद ३६ धावा केल्या असून, ते भारतापेक्षा अद्याप ५६५ धावांनी पिछाडीवर आहेत.

भारतानं आज आपला पहिला डाव पाच गडी बाद ६०१ धावांवर घोषित केला. विराट कोहलीचं नाबाद द्विशतक, भारतीय डावाचं वैशिष्ट्य ठरलं. त्यानं कारकिर्दीतलं २६ वं शतक, तर सातवं द्विशतक  ठोकताना नाबाद २५४ धावा केल्या. सातवं द्विशतक ठोकत, त्यानं प्रत्येकी सहा द्विशतकं करणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना मागे टाकलं.

रवींद्र जडेजानं ९१, अजिंक्य रहाणेनं ५९, तर चेतेश्वर पुजारानं ५८ धावा काढून त्याला चांगली साथ दिली. रबाडानं ३, तर मुथ्थुस्वामी आणि केशव महाराजनं प्रत्येकी एक गडी बाद केला.

दक्षिण आफ्रिकेची पहिल्या डावात सुरुवातीलाच घसरगुंडी उडाली आहे. उमेश यादववनं दोन, तर मोहम्मद शमीनं एक गडी टिपून, दक्षिण आफ्रिकेवर वरचष्मा स्थापित केला आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-03 Dec 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 8.2
मुंबई 35.0 23.0
चेन्नई 26.6 23.9
कोलकाता 29.0 16.0
बेंगलुरू 26.0 17.0