महत्वाच्या घडामोडी
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदार संघांच्या निवडणूकांची मतमोजणी सुरु            नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा            देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९५ लाखांच्या वर            देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सर्वोच्च न्यायालायाचे आदेश            राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार           

Oct 11, 2019
7:31PM

दुसरा एकदिवसिय क्रिकेट जिंकत भारतीय महिला क्रिकेट संघानी दक्षिण आफ्रिकेविरिद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी

आकाशवाणी
गुजरातेत वडोदरा इथं झालेला दुसरा एकदिवसाचा क्रिकेट सामना पाच गडी राखून जिंकत भारतीय महिला क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेवर तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारल्यानंतर भारतानं दक्षिण आफ्रिकेला ५० षटकात ६ बाद २४७ अशा धावसंख्येवर रोखलं. दक्षिण आफ्रिकेतर्फे वोलवार्डने सर्वाधिक ६९ धावा केल्या. तिला ली नं ४०, डू प्रिझनं ४४, गुडॉलनं ३८ धावा काढून चांगली साथ दिली. शिखा पांडे, एकता बिश्त आणि पुनम यादवनं प्रत्येकी दोन बळी मिळवले.

विजयासाठी २४८ धावांचं आव्हांन भारतीय महिलांनी पाच गडी गमावून ४८ व्या षटकातच पूर्ण केलं. पूनम राऊतनं ६५  तर मिताली राजनं ६६ धावा काढत तिस-या गड्यासाठी केलेली १२९ धावांची भागीदारी भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-03 Dec 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 8.2
मुंबई 35.0 23.0
चेन्नई 26.6 23.9
कोलकाता 29.0 16.0
बेंगलुरू 26.0 17.0