महत्वाच्या घडामोडी
अंतिम वर्षाच्या परीक्षा ६० टक्के ऑनलाईन आणि ४० टक्के ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार - उदय सामंत            सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ - उध्दव ठाकरे            महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती तीन आठवड्यात सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश            कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकरी स्वतंत्र होणार मात्र विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            रेल्वेतील रिक्त पदं रद्द करण्याची कोणतीही योजना नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण           

Oct 11, 2019
1:48PM

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आजपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर

आकाशवाणी
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग दोन दिवसांच्या भारत दौर्‍यासाठी आज दुपारी चेन्नई इथं पोचतील. तामिळनाडूत मामलापुरम इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह उद्या होणार्‍या दुसर्‍या अनौपचारिक शिखर बैठकीसाठी ते येत आहेत. प्राचीन संस्कृती आणि चीनसह व्यापारसंबंध तसंच भारताची विविधता अधोरेखित व्हावी यासाठी दिल्ली व्यतिरिक्त अन्य स्थळाची अर्थात, ममलापुरमची बैठकीसाठी निवड केली आहे. ही बैठक दोन दिवस चालणार असून, त्यासाठी तिथं चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. चिनी पाहुण्यांच्या स्वागतासाठी विमानतळही पारंपरिक म्हणजे केळीची पानं, फुलांचे हार आणि फळांनी सुशोभित केला आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-18 Sep 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 37.0 26.0
मुंबई 32.0 25.0
चेन्नई 33.0 26.0
कोलकाता 35.0 28.0
बेंगलुरू 28.0 21.0