महत्वाच्या घडामोडी
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदार संघांच्या निवडणूकांची मतमोजणी सुरु            नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा            देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९५ लाखांच्या वर            देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सर्वोच्च न्यायालायाचे आदेश            राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार           

Oct 10, 2019
5:17PM

पीएमसी बँकेच्या खातेदारांच्या ठेवी सुरक्षित राहण्यासाठी सरकार लवकरच कायद्यांमधे सुधारणा करेल : निर्मला सीतारामण

आकाशवाणी
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांच्या ठेवी सुरक्षित रहाव्यात म्हणून सरकार लवकरच कायद्यांमधे सुधारणा करेल, असं आश्वासन आज केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांनी बँकेच्या खातेदारांना दिलं. मुंबईतल्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात वार्ताहर परिषदेसाठी येणा-या सीतारामन यांना बँकेच्या खातेदारांनी घेराव घातला. त्यावेळी त्या बोलत होत्या. आर्थिक सेवा खाते तसंच आर्थिक गुन्हे खात्याच्या सचिवांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्यूटी गर्व्हनरांसोबत बैठक होणार असून, अशा अनेक सहकारी बँकांच्या कार्यपद्घतीतल्या उणीवांवर लक्ष ठेवलं जाणार आहे, असं त्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं.आर्थिक मंदीतून देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकार प्रत्येक व्यवसाय क्षेत्रासाठी विशेष उपाययोजना करत असल्याची ग्वाही, सीतारामण यांनी यावेळी दिली. भारताच्या सकल घरगुती उत्पादनानं गेल्या सहा वर्षांमधला नीचांक गाठला असून रिझर्व्ह बँकेनं येत्या आर्थिक वर्षात त्याचा दर सहा पूर्णांक एक दशांश टक्के इतका कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. यासाठी सरकारनं, कॉर्पोरेट करांमधे कपात, निर्यातीत सुधारणा, सुलभ पतपुरवठा इत्यादी अनेक उपाययोजना केल्या आहेत, असं त्या म्हणाल्या. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-03 Dec 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 8.2
मुंबई 35.0 23.0
चेन्नई 26.6 23.9
कोलकाता 29.0 16.0
बेंगलुरू 26.0 17.0