महत्वाच्या घडामोडी
कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं आश्वासन            वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु            मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार            राज्यात विविध ठीकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा           

Oct 10, 2019
4:58PM

प्रचार सभा - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करू : देवेंद्र फडणवीस

आकाशवाणी
नाशिकसह राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निवडणूक संपताच आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्यात सटाणा इथं दिली . विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज त्यांची सटाणा आणि चांदवड इथं सभा झाली. यावेळी ते बोलत होते . आघाडी सरकारनं उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणार्या नारपार प्रकल्पावर  इतकी वर्ष केवळ राजकारण  केलं मात्र गेली पाच वर्ष भाजप सरकारनं  सातत्यानं पाठपुरावा करून कामाला मान्यता देऊन पाहणी सुरु आहे, असं ते म्हणाले. यावेळी कॉंग्रेसचे नगरसेवक ,माजी जिल्हापरिषद सदस्य पोपट अहिरे यांनी भाजपात प्रवेश केला. सांगली कोल्हापूरच्या पुराचं पाणी सोलापूर, मंगळवेढ्यासारख्या दुष्काळी भागात वळवण्यात येणार असून त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढ्यात सांगितलं. युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सोलापूर दौऱ्यावर आले होते. राज्यात युतीला तुल्यबळ विरोधक नसल्यामुळे राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0