महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Oct 10, 2019
1:52PM

पोलीस दल नागरिकस्नेही करण्यासाठी काम केलं पाहिजे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

आकाशवाणी
पोलीस दलाबाबत सामान्य नागरिक काय विचार करतात हे प्रत्येक पोलीस अधिका-यानं समजून घेतलं पाहिजे, आणि पोलीस दल नागरिकस्नेही करण्यासाठी काम केलं पाहिजे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं भारतीय पोलीस सेवेच्या २०१८ च्या तुकडीतल्या १२६ परीविक्षाधीन अधिकार्‍यांशी संवाद साधताना बोलत होते. गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची असली पाहिजे, त्यासाठी नागरिकांना पोलिसांपर्यंत सहज पोचता आलं पाहिजे, असं ते म्हणाले. 

तंत्रज्ञान महत्त्वाचं असून त्याद्वारे पोलिसांनी आधुनिक होणं, आणि सामाजिक बदलाचे वाहक होणं आवश्यक आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. या तुकडीत महिला अधिका-यांची संख्या मोठी आहे, याबद्दल आनंद व्यक्त करत, राष्ट्रनिर्मितीसाठी याचा चांगला परिणाम होईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0