भारतीय रिझर्व्हबँकेनं चालू आर्थिक वर्षातलं चौथं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केलं. बँकेनं रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली आहे.आता ५ पुर्णांक १५ दशांश टक्के असा नवा रेपोदर असेल. रिझर्व्हबँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. रिझर्व्ह बँकेनं सलग पाचव्यांदाव्याजदरात कपात केली आहे. रिव्हर्स रेपोदर ही आता पाव टक्क्यानं कमी होऊन चार पूर्णांक ९० शतांश टक्के इतका आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनवाढीच्या दराचं अनुमानरिझर्व्ह बँकेनं ६ पूर्णांक ९ दशांशावरून ६ पूर्णांक १ दशांश टक्क्यांपर्यंत खालीआणलं आहे.