महत्वाच्या घडामोडी
सर्वांची सहमती मिळाली तर राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन राहील - आरोग्यमंत्री            रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या औषधी घटकांच्या निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी            राज्यातल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी योग्य ती सुधारणात्मक पावलं उचलण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्याला सूचना            महात्मा ज्योतिबा फुले य़ांच्या जयंतीनिमित्त त्यांना प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह देशाची आदरांजली            राज्याची लसीकरणाच्या बाबतीत आघाडी कायम           

Apr 08, 2021
7:37PM

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांची याचिका फेटाळली

आकाशवाणी
सर्वोच्च न्यायालयानं राज्य़ सरकार आणि अनिल देशमुख यांची याचिका आज फेटाळली. हे प्रकरण गंभीर असून, याची चौकशी होणं गरजेचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायलयानं दिलेल्या निकाला प्रमाणे अनिल देशमुख यांची सी बी आय मार्फत प्रथमिक चौकशी होणार आहे. 

या प्रकरणात आणखी बड्या नेत्यांची नावं समोर येतील अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दिली. हा तपासाचा फेरा आता निर्णायक वळणावर आला आहे, असेही ते म्हणाले. 

या निर्णयावर जास्त काही प्रतिक्रिया न देता वाझेच्या मागे नक्की कोण आहे, याचा तपास करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. भाजपा नेते राज्य सरकार पाडण्याचा अथक प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना यश येणार नाही. सुशांत सिंग प्रकरणा प्रमाणे या प्रकरणातही काहीच आढळणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-11 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 37.2 16.0
मुंबई 33.5 24.0
चेन्नई 34.1 27.4
कोलकाता 36.5 26.2
बेंगलुरू 33.8 21.5