महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Apr 08, 2021
7:30PM

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचा राजेश टोपे यांनी केला पुनरुच्चार

आकाशवाणी
इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या अधिक असूनही त्या मानाने राज्याला लसींचा पुरेसा पुरवठा होत नसून त्या बाबत आपण आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या बोललो असून त्यांनी सकारात्मक प्रसिसाद दिला असल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितलं.

राज्याला आठवड्याला ४० लाख लसींची आवश्यकता असून सध्या आठवड्याला केवळ साडेसात लाख लसींची मात्रा उपलब्ध होत असून ते आमच्या गतीप्रमाणे नाही असंही ते म्हणाले. या बाबत राज्यात साडेचार लाख सक्रिय रुग्ण आहेत. तर ५७ हजार मृत्यू झाल्याचंही ते म्हणाले. केंद्रिय आरोग्य मंत्री हर्षवर्धन हे राज्याला अधिक लसींची मात्रा देण्यात सकारात्मक असूनही काही व्यवस्थापनात त्रुटी असल्याचंही ते म्हणाले.

गुजरात राज्यात केवळ १७ हजार सक्रिय रुग्ण असतांना व त्यांची लोकसंख्या केवळ ६ कोटी असतांना त्यांना १ कोटी लसींची मात्रा देण्यात आल्या असून १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राला केवळ १ कोटी ४ लाख लसींची मात्रा देण्यात आलेली आहे. असंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात गेल्या वर्षभरापासून सर्व आरोग्य कर्मचारी, जिल्हाधिकारी, इतर अधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री हे अहोरात्र काम करत आहेत. सर्वाधिक चाचण्या राज्यात होत आहेत. त्याचप्रमाणे लसीकरण केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनास्थितीचा योग्य मुकाबला होत नाही असं म्हणणं चुकीचं आहे असंही ते म्हणाले.

रेडिसिमीवर इंजेक्शनच्या उत्पादक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी आपण आज चर्चा करणार असल्याच सांगतांनाच त्यांनी राज्यातल्या ऑक्सीजनच्या पुरवठ्याबाबतही उपाययोजना करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्र सरकार १५ एप्रिल नंतर साडेसात लाखाऐवजी १७ लाख लसींची मात्रा पाठवणार असले तरी ते देखिल पुरेसे नाही असंही ते म्हणाले. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0