महत्वाच्या घडामोडी
भारतीय खेळणी महोत्सव २०२१ चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन            समाज माध्यमांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीत तंत्रज्ञानाधारीत व्यासपीठांवरच्या मजकूरांवर बंदीची कोणतीही तरतूद नसल्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण            संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी            राज्यभरात मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन            प्रधानमंत्री उद्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद           

Feb 23, 2021
7:32PM

जगात आरोग्य व्यवस्थेत भारताची प्रतिमा आणि आत्मविश्वास नव्या पातळीवर - प्रधानमंत्री

आकाशवाणी

जगात आरोग्य व्यवस्थेत भारताची प्रतिमा आणि आत्मविश्वास नव्या पातळीवर पोचला असून कोरोना संकटाच्या काळात आरोग्य क्षेत्रातल्या भारताच्या ताकदीची दखल जगानं घेतली, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

ते आज आरोग्य क्षेत्राविषयीच्या वेबिनारमधे बोलत होते. कोरोनाच्या संकटकाळात सरकारनं अल्पावधीत उत्तम आरोग्यविषयक पायाभुत सुविधा निर्माण केल्या. सरकार आणि खासगी क्षेत्राच्या समन्वयातून चाचणी प्रयोगशाळांचं व्यापक जाळं उभारलं त्यामुळे या आजाराला प्रभावीरित्या तोंड देता आलं, असं ते म्हणाले.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी केलेली अभूतपूर्व तरतूद सरकारची देशवासियांच्या आरोग्याबद्दलची बांधिलकी दाखवणारी आहे. आरोग्य क्षेत्रावर ७० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे आरोग्य सुविधांमधे सुधारणा होईल, तसंच अधिक रोजगारही निर्माण होतील, असं ते म्हणाले.

लोकांना निरोगी ठेवण्यासाठी भारत एकाचवेळी चार आघाड्यांवर काम करत आहे, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. पहिल्या आघाडीवर आजाराला आळा आणि तंदुरूस्तीला उत्तेजन, तर दुसऱ्या आघाडीवर गरीबांना स्वस्तात परिणामकारक उपचार पुरवण्यावर भर दिला आहे.

तिसऱ्या आघाडीवर आरोग्य विषयक पायाभूत सुविधा आणि आरोग्य क्षेत्रातले व्यावसायिक यांची संख्या आणि गुणवत्ता वाढवणं, तर समस्यांवर मात करण्यासाठी सतत काम करत राहणं ही चौथी आघाडी आहे, असं ते म्हणाले.

२०२५ पर्यंत देशातून क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्याचं लक्ष्य भारतानं निश्चित केलं आहे, याचा पुनरुच्चार त्यांना केला. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Feb 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.2 15.2
मुंबई 36.0 21.2
चेन्नई 32.2 20.4
कोलकाता 36.3 21.6
बेंगलुरू 33.0 17.4