महत्वाच्या घडामोडी
भारतीय खेळणी महोत्सव २०२१ चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन            समाज माध्यमांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीत तंत्रज्ञानाधारीत व्यासपीठांवरच्या मजकूरांवर बंदीची कोणतीही तरतूद नसल्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण            संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी            राज्यभरात मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन            प्रधानमंत्री उद्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद           

Feb 23, 2021
7:39PM

राज्यात काल ५ हजार ८६९ रुग्ण या कोरोनामुक्त

आकाशवाणी
राज्यात काल ५ हजार ८६९  रुग्ण या कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २० लाख ५  हजार ८५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ पूर्णांक ९६ शतांश टक्के इतकं झालं आहे.

काल ६ हजार २१८ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या २१ लाख १२ हजार ३१२ झाली आहे. सध्या राज्यभरात ५३ हजार ४०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आज ५१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ८३९ झाली आहे.

सिंधुदुर्गात आज  बरे झालेल्या ८ रुग्णांना घरी पाठवण्यात आलं. आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६ हजार ४३  झाली आहे.  जिल्ह्यात आज ५ जणांचे  अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६ हजार ४०५ झाली आहे.  सध्या जिल्ह्यात १८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १७३ झाली आहे.

भंडारा जिल्ह्यात आज १० रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार २९  झाली आहे. आज २२ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यात  पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३  हजार ५३४ झाली आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Feb 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.2 15.2
मुंबई 36.0 21.2
चेन्नई 32.2 20.4
कोलकाता 36.3 21.6
बेंगलुरू 33.0 17.4