महत्वाच्या घडामोडी
वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु            मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार            राज्यात विविध ठीकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा            वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध           

Oct 22, 2020
7:19PM

अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी सरकारी रोख्यांची खुल्या बाजारात खरेदी करण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा निर्णय

Twitter
अर्थव्यवस्थेत तरलता यावी, यासाठी सरकारी रोख्यांची खुल्या बाजारात खरेदी करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. येत्या 29 ऑक्टोबर रोजी OMO अर्थात  खुल्या बाजारात  लिलावाच्या  माध्यमातून आपण  एकूण 20 हजार कोटी रुपयांचे सरकारी  रोखे खरेदी करणार असून यात  सहभागी होण्यासाठी संबंधित व्यक्तींनी  सकाळी 10 ते  11या वेळात आपली बोली  बँकेच्या संकेतस्थळावर दाखल करावी, असं रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

देशाची अर्थव्यवस्था  प्रवाही राहावी, यासाठी  OMO अंतर्गत देशातल्या व्यापारी बँकांबरोबर  सरकारी रोख्यांची खरेदी अथवा विक्री होत असल्याचं यात म्हटलं आहे.

तसंच SDL  अर्थात राज्य विकास कर्ज रोख्यांच्या माध्यमातून राज्यांच्या अर्थव्यवस्थेत प्रवाहीपणा आणणार असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.


   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0