महत्वाच्या घडामोडी
मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार            राज्यात विविध ठीकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा            वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध            FTH हॉकी लीगमध्ये उद्या भारताचा सामना आर्जेन्टिनाबरोबर           

Aug 14, 2020
7:27PM

भारतीय रिसर्व बँकेचा केंद्र सरकारला अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय

आकाशवाणी

केंद्र सरकारला २०१९-२० या लेखा वर्षासाठी, ५७ हजार १२८ कोटी रुपये, अतिरिक्त निधी म्हणून हस्तांतरित करायला, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळानं मंजूरी दिली आहे.

बँकेच्या केंद्रीय मंडळाची आज, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय झाला. याशिवाय आपत्कालीन निधीची मर्यादा साडेपाच टक्क्यापर्यंत ठेवायचा निर्णयही या बैठकीत झाला असं, बँकेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती तसंच अर्थव्यवस्थेसमोरच्या जागतिक आणि स्थानिक आव्हानांविषयी बैठकीत चर्चा झाल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचा वार्षिक अहवाल, आणि वार्षिक लेखा विवरणालाही या बैठकीत मंजुरी मिळाली.


   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0