महत्वाच्या घडामोडी
कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं आश्वासन            राज्यात विविध ठिकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद            वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु            मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार           

Jul 26, 2020
2:58PM

भारताचा श्रीलंकेशी ४०० दशलक्ष डॉलर्स चलन अदलाबदला संदर्भात करार

आकाशवाणी

  भारतीय रिझर्व्ह् बँकेनं सेंट्रल बँक ऑफ श्रीलंकेशी ४०० दशलक्ष डॉलर्स चलन अदलाबदल सुविधेसंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. नोव्हेंबर २०२२ पर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे.

  भारत आणि श्रीलंकेदरम्यान आर्थिक सहकार्य वाढवण्यासंदर्भात गेला आठवडाभर झालेल्या चर्चेनंतर हा करार करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ च्या साथीच्या आरोग्य आणि आर्थिक क्षेत्रावरील संभाव्य परिणामांविषयी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी मे मध्ये दूरध्वनीवरून चर्चा केली होती.

  त्यावेळी कोविडच्या संकटातून सावरण्यासाठी भारत श्रीलंकेला सर्वतोपरी सहकार्य करेल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0