महत्वाच्या घडामोडी
कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं आश्वासन            राज्यात विविध ठिकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद            वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु            मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार           

Jun 23, 2020
5:15PM

पीपीई किट्स निर्मितीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर

आकाशवाणी

भारतीय अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी, केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनं तातडीच्या उपाययोजना केल्या आहेत, असं अर्थविभागानं निवेदनाद्वारे म्हटलं आहे. गेल्या दोन महिन्यात भारत, पीपीई किट्स निर्मितीत जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे यावरून भारतीय उत्पादन क्षमतेची लवचिकता दिसून येते, असं या निवेदनात म्हटलं आहे. 

मे आणि जून या दोन महिन्यात वीज आणि कोळशाचा वापर वाढला आहे, तसच आंतरराज्य आणि राज्यांतर्गत मालवाहतूकही वाढली, यावरूनही हेच स्पष्ट होतं, असही नमूद करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांकडून केंद्रीय संस्था करत असलेल्या गव्हाच्या खरेदीनं 16 जून पर्यंत, 382 लाख टनाचा विक्रमी आकडा गाठला आहे, तर यामुळे 42 लाख शेतकऱ्यांना फायदा होऊन, आतापर्यंत त्यांना एकूण, 73 हजार 500 कोटी रुपये एवढी रक्कम, गव्हाच्या किमान आधारभूत किंमतीपोटी अदा झाली असल्याची माहितीही या निवेदनात दिली आहे.

दररोजची पथकर वसुलीही, एप्रिल मधल्या सरासरी सव्वा आठ कोटी रुपयांवरून, मे मध्ये 36 कोटी 84 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0