महत्वाच्या घडामोडी
मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार            राज्यात विविध ठीकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा            वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध            FTH हॉकी लीगमध्ये उद्या भारताचा सामना आर्जेन्टिनाबरोबर           

May 22, 2020
4:25PM

रेपो दरात कपात करण्याच्या निर्णयाचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं स्वागत

आकाशवाणी

रेपो दरात कपात करण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी स्वागत केलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसंच अन्य उद्योगांना किफायतशीर दरात पतपुरवठा उपलब्ध होणार असल्यामुळे मागणीत वाढ होईल आणि आत्मनिर्भर भारताचं प्रधानमंत्र्यांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारायला मदत होईल, असं ते म्हणाले. 

व्याजदरात कपातीच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं असोचॅम, भारतीय उद्योग महासंघ आणि फिक्कीनं स्वागत केलं आहे. अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक महत्वपूर्ण पावलं उचलत असून यामुळे अनेक उद्योगांना दिलासा मिळणार असल्याचं असोचॅमचे सरचिटणीस दीपक सूद यांनी म्हटलं आहे. 

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक करत असलेल्या उपाययोजना उत्साह वाढवणाऱ्या असल्याचं सीआयआयचे सरचिटणीस चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. या उपाययोजनांमुळे उद्योग आणि एकूणच अर्थव्यवस्थेला मदत होईल असं फिक्कीचे सरचिटणीस दिलीप चेनॉय यांनी म्हटलं आहे. 
 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0