महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेमुळे देशातल्या गरीब नागरिकांना औषधांवरच्या मोठ्या खर्चातून दिलासा मिळाला असल्याचं प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन            देशात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या २ कोटीच्या वर            नाशिक इथं होणारं ९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित            मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतले जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन            राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण           

Mar 17, 2020
2:51PM

देशातल्या सर्व शाळा, महाविद्यालयं, संग्रहालयं आणि जलतरण तलाव ३१ मार्च पर्यंत बंद

आकाशवाणी
केंद्र सरकारनं देशातल्या सर्व शैक्षणिक संस्था संग्रहालय, व्यायामशाळा, जलतरण तलाव, तसंच चित्रपटगृह येत्या 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भातल्या सूचना सर्व राज्यसरकारांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, केरळ, ओदिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाख इथं चार नवीन संशयित रुग्ण आढळले असून, देशातील रुग्णांची संख्या 114 वर पोचली आहे.

कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे सहसचिव लव अगरवाल यांनी काल पत्रकारांना सांगितलं.

अनावश्यक प्रवास टाळावा, तसंच खाजगी आस्थापनांनी कर्मचा-यांना घरातून काम करण्याची सुविधा द्यावी, असंही अगरवाल यांनी सांगितलं.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-07 Mar 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 31.5 14.4
मुंबई 32.8 19.8
चेन्नई 32.2 24.8
कोलकाता 36.2 20.8
बेंगलुरू 35.9 17.5