महत्वाच्या घडामोडी
देशातला शेअर बाजार आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा            ४३ मोबाईल ॲप्लिकेशन बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय            राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय नाही, नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये - राजेश टोपे            कोविड लसीचं वितरण आणि लसीकरण या संदर्भात कृती दलाची स्थापना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे           

Mar 06, 2020
9:37AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शाळांसाठी सल्ला देणारं निवेदन केलं प्रसिद्ध

आकाशवाणी

देशामधल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शाळांसाठी सल्ला देणारं निवेदन प्रसिद्ध केलं आहे. शाळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना एकत्र येऊ देऊ नये, असा सल्ला यामध्ये देण्यात आला आहे.

कोविड-१९ हा संसर्गजन्य आजार पसरलेल्या कुठल्याही देशामध्ये जाऊन आलेला विद्यार्थी किंवा कर्मचारी यांच्यावर लक्ष ठेवावे तसंच त्यांना १४ दिवस घरामधे वेगळे ठेवावे.

विद्यार्थ्यांमधे ताप, खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास होणे अशाप्रकारची लक्षणं दिसली तर वर्गशिक्षकांनी ताबडतोब त्याच्या पालकांना हे कळवून विद्यार्थ्याला तपासणीसाठी पाठवावे, तसंच वैद्यकीय उपचार सुरु असताना मुलांना शाळेत पाठवू नये, असंही आरोग्य मंत्रालयानं पालकांना सांगितलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-25 Nov 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 24.0 09.0
मुंबई 34.0 20.0
चेन्नई 27.0 23.0
कोलकाता 27.0 17.0
बेंगलुरू 28.0 18.0