महत्वाच्या घडामोडी
विकास निधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार            कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करणार            वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर            कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवर २०२०-२१ या वर्षासाठी साडेआठ टक्के व्याजदर देण्याची केंद्रीय मंडळाची शिफारस            राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण           

Feb 23, 2020
8:56PM

दक्षिण कोरियामधे नोवेल कोराना विषाणूग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्यानं अति दक्षतेचा इशारा

आकाशवाणी

दक्षिण कोरियामधे नोवेल कोराना विषाणूग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्यानं अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रासाठी पुढचे काही दिवस सतर्कतेचे असल्याचं दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून- जे – इन यांनी आज सरकारी बैठकीनंतर सांगितलं. चीननंतर दक्षिण कोरियामधे सर्वात जास्त ५५६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडले आहेत. 

डायमंड प्रिसेंस या जहजावरुन उतरवण्यात आलेल्या महिलेला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचं जपाननं आज जाहीर केलं. यापूर्वीच्या चाचणीत तिला कोरोनाची लागण झाली नसल्याचं निष्पन्न झालं होतं. युरोपात सर्वप्रथम इटालीमधे कोरोना संसंर्गानं दोनजणांचा मृत्यू झाला असून, अनेकजणांना या विषाणूची बाधा झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकार विशेष काळजी घेत असल्यांच इटालीच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे.

इराणमध्ये कोरोना विषाणुमुळे पाचजणांचा मृत्यू झाल्यामुळे सरकारनं शाळा विद्यापीठं आणि सांस्कृतिक केंद्रं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनामुळे मृत्यूची नोंद झालेला मध्यपूर्व आशियातला इराण हा पहिलाच देश आहे. इराकनं इराणला जाणारी विमानसेवा बंद केली आहे. आफ्रिकेत एकट्या इजिप्तमधे कोरोना बाधित रुग्ण सापडले असले तरीही जागतिक आरोग्य संघटनेनं सर्वच आफ्रिकन देशांना सतर्कतेचा सल्ला दिला आहे. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-04 Mar 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 30.8 12.2
मुंबई 38.0 19.0
चेन्नई 34.3 21.6
कोलकाता 35.2 19.0
बेंगलुरू 33.0 18.0