महत्वाच्या घडामोडी
अंतिम वर्षाच्या परीक्षा ६० टक्के ऑनलाईन आणि ४० टक्के ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार - उदय सामंत            सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ - उध्दव ठाकरे            महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती तीन आठवड्यात सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश            कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकरी स्वतंत्र होणार मात्र विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            रेल्वेतील रिक्त पदं रद्द करण्याची कोणतीही योजना नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण           

Feb 19, 2020
10:38AM

चीनमधे कोरोनामुळे मृत्यूमुखींची संख्या दोन हजारावर

आकाशवाणी

चीनमधे नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दोन हजारावर पोचली आहे. काल हुबेई प्रांतात आणखी १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तिथं आणखी एक हजार ६९३ जणांना या विषाणूची बाधा झाली असल्याचं हुबेई प्रांताच्या आरोग्य आयोगानं सांगितलं. यामुळे चीनमधल्या कोरोनाबाधिक रुग्णांची संख्या आता ७४ हजाराच्या वर गेली आहे. मात्र यापैकी बहुतांश रुग्णांचा आजार किरकोळ असल्याचा दावा चीनी अधिका-यांनी प्रसिद्ध केलेल्या अभ्यास अहवालात केला आहे.

हुबेई प्रांताबाहेर या विषाणुच्या प्रादुर्भावाला आळा घालण्याचे प्रयत्न सुरु केल्यापासून नव्यानं नोंद होणा-या रुग्णांची संख्या घटत आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असल्याचं हे लक्षण आहे, असं चीनच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणानं म्हटलं आहे.

चीननं उचलेल्या पावलांनंतर याबाबत लक्षणीय प्रगती झाली असल्याचं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी काल ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांना दूरध्वनीवरुन सांगितलं. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आता घटत जाईल, असं एवढयात सांगणं घाईचं ठरेल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-18 Sep 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 37.0 26.0
मुंबई 32.0 25.0
चेन्नई 33.0 26.0
कोलकाता 35.0 28.0
बेंगलुरू 28.0 21.0