महत्वाच्या घडामोडी
मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार            राज्यात विविध ठीकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा            वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध            FTH हॉकी लीगमध्ये उद्या भारताचा सामना आर्जेन्टिनाबरोबर           

Feb 07, 2020
3:19PM

कुपोषणाच्या समस्येचं टप्प्याटप्प्यानं समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशानं पोषण अभियान राबवलं जात - स्मृती इराणी

आकाशवाणी

कुपोषणाच्या समस्येचं टप्प्याटप्प्यानं समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशानं देशभरात पोषण अभियान राबवलं जात असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

त्या आज लोकसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना बोलत होत्या. सेवांचा कालबद्ध रितीनं पुरवठा, काटेकोर देखरेख, आणि त्यासोबतच सोयीसुविधांच्या उपलब्धता सुनिश्चित करण्याचं काम पोषण अभियाना अंतर्गत केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

दोन हजार बावीस सालापर्यंत शून्य ते सहा वयोगटाल्या मुलांमधलं कुपोषणाचं प्रमाण ३८ पूर्णांक चार ४ दशांश टक्क्यांवरून २५टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा उद्देश असल्याचं त्या म्हणाल्या.

या अभियानाचा आढावा घेण्यासाठी गेल्या आठ महिन्यांमध्ये १६ राज्यांच्या मुख्यंमंत्र्यांसोबत बैठका घेऊन चर्चा केल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.    

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0