महत्वाच्या घडामोडी
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज होणाऱ्या जनौषधी दिवस कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार सहभागी            राज्यात आतापर्यंत २० लाख ६२ हजार ३१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त            ‘नटश्रेष्ठ’ श्रीकांत मोघे यांचं निधन            इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा १ डाव २५ धावांनी विजय           

Feb 07, 2020
9:44AM

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे-थे, पतधोरण आढावा समितीच्या सदस्यांनी घेतला एकमतानं निर्णय

आकाशवाणी
रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षातला शेवटचा द्वैमासिक पतधोरण आढावा आज जाहीर केला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालच्या सहा सदस्यीय आढावा समितीनं एकमतानं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे रेपो दर ५ पूर्णांक १५ टक्के, तर रिव्हर्स रेपो दर ४ पूर्णांक ९ टक्केच राहणार आहे. बँक दरातही या पतधोरण आढाव्यात कोणताही बदल झाला नसून तो ५ पूर्णांक ४ टक्के कायम आहे.

चलनफुगवट्याचा दर निर्धारित उद्दिष्टाच्या आत ठेवत अर्थव्यवस्थेची वाढ कायम राखणं गरजेचं  आहे, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-07 Mar 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 31.5 14.4
मुंबई 32.8 19.8
चेन्नई 32.2 24.8
कोलकाता 36.2 20.8
बेंगलुरू 35.9 17.5