महत्वाच्या घडामोडी
देशातला शेअर बाजार आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा            ४३ मोबाईल ॲप्लिकेशन बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय            राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय नाही, नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये - राजेश टोपे            कोविड लसीचं वितरण आणि लसीकरण या संदर्भात कृती दलाची स्थापना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे           

Feb 02, 2020
7:40PM

कोरोना विषाणूबाधित दुसरा रुग्ण केरळात आढळला

आकाशवाणी

नोवेल कोरोना विषाणूबाधित दुसरा रुग्ण केरळात आढळला आहे. त्याला अलापूझा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केलं असून विशेष देखरेखीखाली ठेवल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

हा रुग्ण नुकताच चीनमधून भारतात परतला होता. आरोग्य राज्यमंत्री के. के. शैलजा यांनी कोल्लम इथं वार्ताहरांना सांगितलं की, रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याचा सविस्तर अहवाल झाल्यानंतरच विषाणू संसर्गाबाबत माहिती मिळेल.

केरळात सर्वत्र प्रतिबंधक पावलं उचलली असून लोकानां दक्ष रहायला सांगितल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. चीन तसंच इतर संसर्गजन्य भागातून परतलेल्यांनी नियंत्रण कक्षात जाऊन वैद्यकीय तपासणी करुन घेण्याची सूचना केरळ सरकारनं दिली आहे. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 25.0 07.0
मुंबई 32.0 20.0
चेन्नई 312.0 23.0
कोलकाता 28.0 15.0
बेंगलुरू 26.0 17.0