महत्वाच्या घडामोडी
देशातला शेअर बाजार आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा            ४३ मोबाईल ॲप्लिकेशन बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय            राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय नाही, नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये - राजेश टोपे            कोविड लसीचं वितरण आणि लसीकरण या संदर्भात कृती दलाची स्थापना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे           

Jan 31, 2020
12:34PM

चीनमध्ये नोवेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्धवलेल्या स्थितीवर सरकारचं लक्ष- रवीश कुमार

आकाशवाणी
 
चीनमध्ये नोवेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्धवलेल्या स्थितीवर सरकारचं सातत्यानं लक्ष असून प्रदेशातल्या भारतीय नागरिकांची सुरक्षितता आणि कल्याणासाठी कटीबद्ध आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटलं आहे. ते काल रात्री नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते.

चीनमधल्या हुबेई प्रांतात राहणा-या ६०० पेक्षा जास्त भारतीयांशी संपर्क झाला असून त्यांना भारतात परतण्याची इच्छा आहे का, याची खातरजमा करुन घेतली आहे, असं त्यांनी सांगितलं.

नोवेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचं आव्हान पैलण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय खूप महत्त्वाचे आहेत, असं राष्ट्रीय संसंर्गजन्य आजार संस्थेचे संचालक डॉ सुजीत कुमार यांनी सांगितलं.

या विषाणूसंदर्भात जनतेच्या शंकांना उत्तर देण्यासाठी एक कॉल सेंटर चोवीस तास चालू आहे. त्याचा दूरध्वनी क्रमांक आहे ०११-२३९७८०४६.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 25.0 07.0
मुंबई 32.0 20.0
चेन्नई 312.0 23.0
कोलकाता 28.0 15.0
बेंगलुरू 26.0 17.0