महत्वाच्या घडामोडी
विविध विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षा येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याची तज्ञ समितीची शिफारस            देशभरात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर, सध्या ६१ पूर्णांक १३ शतांश टक्क्यावर            राज्यात काल ३ हजार ५२२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले            जागतिक बँक आणि केंद्र सरकार यांच्यात ७५ कोटी अमेरिकी डॉलर्सचा करार           

Jan 27, 2020
10:14AM

कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर चीन आणि हाँगकाँगमधल्या 30 प्रांतीय क्षेत्रात उच्चस्तरीय आपत्कालीन इशारा देण्यात आला आहे.

आकाशवाणी
चीनमधे कोरोना विषाणू संक्रमणामुळे आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन हजार ७६१ लोक बाधित झाले आहेत. यापैकी ३२४ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचं चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं म्हटलं आहे. याशिवाय वुहान शहरातल्या बहुतांश भागात पाच हजार ७९४ संशयीत रुग्ण आढळले आहेत. कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर चीन आणि हाँगकाँगमधल्या ३० प्रांतीय क्षेत्रात उच्चस्तरीय आपत्कालीन इशारा देण्यात आला आहे.

या नवीन विषाणूंचं स्वरुप अद्याप माहित नसल्यामुळे याचं संक्रमण आणखी वाढण्याची शक्यता आहे. या विषाणूचा सामना करण्याच्या प्रयत्नांना गती दिली जाईल, असं आयोगानं म्हटलं आहे. चीननं न्यूमोनियाच्या उपचारासाठी तसंच वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीकरणासाठी एक अब्ज ६१ कोटी अमेरिकन डॉलर्सच्या विशेष निधीची तरतूद केली आहे. 

दरम्यान, आतापर्यंत कुठल्याही भारतीय नागरिकाला या विषाणूची बाधा झाली नसल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी म्हटलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-07 Jul 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 36.2 26.4
मुंबई 29.0 25.0
चेन्नई 34.0 28.0
कोलकाता 32.0 26.0
बेंगलुरू 27.0 21.0