महत्वाच्या घडामोडी
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदार संघांच्या निवडणूकांची मतमोजणी सुरु            नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा            देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९५ लाखांच्या वर            देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सर्वोच्च न्यायालायाचे आदेश            राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार           

Jan 26, 2020
9:40AM

प्रधानमंत्र्यांच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणू प्रादुर्भावावर उच्चस्तरीय बैठक

आकाशवाणी
'कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीनं खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत.  मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे  तपासणी केली जात आहे.

गेल्या सात दिवसांत १ हजार ७८९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातले ६ जण महाराष्ट्रातले होते. त्यासंदर्भात  मुंबईतल्या दोन प्रवाशांना संसर्ग झाल्याचं आढळल्यानं त्यांना कस्तुरबा रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

कोरोना विषाणूंचे नमुने तपासण्यासाठी महाराष्ट्रात पुणे इथं असलेली राष्ट्रीय संसर्गजन्य रोग संशोधन संस्था सज्ज आहे, तसंच आवश्यकता असेल तर देशातल्या आणखी दहा तपासणी केंद्रांमध्ये या विषाणूंचे नमुने तपासले जातील, असंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-03 Dec 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 8.2
मुंबई 35.0 23.0
चेन्नई 26.6 23.9
कोलकाता 29.0 16.0
बेंगलुरू 26.0 17.0