महत्वाच्या घडामोडी
राज्यभरातल्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू            राज्यात नवे ३ हजार ८१ कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या १९२ रुग्णांची नोंद.            कुक्कुट उत्पादनांवर बंदीबाबत फेरविचार करण्याची राज्यांना सूचना            तांत्रिक अडचणीमुळे मुंबईत आज आणि उद्या लसीकरण नाही            दादर-केवाडियासह आठ नव्या रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा           

Jan 25, 2020
9:24AM

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बिजींग मधले चांद्र नवीन वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम रद्द करण्याचा चीनचा निर्णय , काही शहरात प्रवासबंदी लागू

आकाशवाणी

सौदी अरेबियाच्या एका रुग्णालयात काम करणारी एक परिचारिका कोरोना विषाणूनं बाधित झाल्याचं समोर आलं आहे. तिच्या सहकाऱ्यांपैकी अनेक परिचारिका केरळमधल्या आहेत. त्यापैकी शंभर जणींची तपासणी करण्यात आली. या बाधित परिचारिकेवर उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत वेगानं सुधारणा होत आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूच्या भीतीमुळे भारतीय परिचारिकांना वेगळं ठेवल्याची माहिती मिळाल्यावर मुरलीधरन यांनी जेद्दाह इथल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आणि उपचारांची माहिती घेतली.

दरम्यान, यासंदर्भात दूतावासानं ट्विटर संदेशात दिलेल्या माहितीनुसार, तिला एम.ई.आर.एस.- सीओव्ही प्रकारच्या विषाणूची बाधा झाली असून, तो चीनमधल्या वुहान इथं पसरणारा कोरोनाचा प्रकार नाही. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-18 Jan 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 15.3 9.0
मुंबई 30.0 19.0
चेन्नई 29.8 20.6
कोलकाता 24.0 14.0
बेंगलुरू 29.6 15.5