महत्वाच्या घडामोडी
नव्या कृषी कायद्याला एक ते दी़ड वर्ष स्थगिती देण्याचा केंद्र सरकारचा मानस            राज्यात २६७ केंद्रांवर १८ हजार १६६ कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण            कापूस उत्पादक पणन महासंघाला १५०० कोटी रुपये कर्ज हमीला राज्यशासनाची मंजूरी            ७८ वर्षीय ज्यो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान            खरीप विपणन हंगाम खरेदी योजनेचा ८१ लाख शेतकऱ्यांना लाभ - केंद्र सरकार           

Jan 02, 2020
9:01AM

वस्तू आणि सेवाकराच्या दरांमधली कपात आजपासून लागू होणार, २३ वस्तू आणि सेवा होणार स्वस्त

आकाशवाणी

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराचे कमी केलेले दर लागू होत असल्यानं आजपासून 23 वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत.

चित्रपटाची तिकिटं, टीव्ही आणि मॉनिटर स्क्रिन, पॉवर बँक, यांचा त्यात समावेश आहे. या 23 वस्तू आणि सेवांचे कर दर कमी करण्याचा, तसंच संगीत विषयक पुस्तकं, साठवणूक केलेल्या भाज्या, आणि जन धन योजनेसाठी बँकांमधली बचत खाती, यांना करातून सूट द्यायचा निर्णय जीएसटी परिषदेनं 22 डिसेंबरला घेतला होता.

28 टक्के कराच्या स्लॅबचं सुसूत्रिकरण करताना समितीनं अनेक वस्तू त्यातून हटवून 18 टक्क्याच्या स्लॅबमधे आणल्या आहेत. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-21 Jan 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 18.3 7.4
मुंबई 32.0 18.0
चेन्नई 29.0 23.2
कोलकाता 28.0 14.6
बेंगलुरू 29.4 17.0