महत्वाच्या घडामोडी
पुण्याच्या सिरम इन्स्टीट्यूटच्या नवीन इमारतीला आग            नव्या कृषी कायद्याला एक ते दी़ड वर्ष स्थगिती देण्याचा केंद्र सरकारचा मानस            राज्यात २६७ केंद्रांवर १८ हजार १६६ कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण            कापूस उत्पादक पणन महासंघाला १५०० कोटी रुपये कर्ज हमीला राज्यशासनाची मंजूरी            ७८ वर्षीय ज्यो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान           

Dec 18, 2019
10:25AM

वस्तू आणि सेवाकर परिषदेची आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

आकाशवाणी

वस्तू आणि सेवाकर परिषदेची आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. या बैठकीत महसूल वृद्घीच्या दृष्टीनं कर रचनेचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात जीएसटी करसंकलनात ६ टक्क्यांची वाढ होऊन तो एकूण एक लाख तीन हजार ४९२ कोटी कर जमा झाला. आजच्या बैठकीपूर्वी केंद्रानं जीएसटी करपरताव्यापोटी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ३५ हजार २९८करोड रुपये दिले आहेत. केंद्र आणि राज्यांनी जीएसटी करसंकलनासाठी जास्त प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-21 Jan 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 18.3 7.4
मुंबई 32.0 18.0
चेन्नई 29.0 23.2
कोलकाता 28.0 14.6
बेंगलुरू 29.4 17.0