महत्वाच्या घडामोडी
देशातले शेतकरी, प्रक्रिया प्रकल्प, स्टार्ट-अप्स तसेच सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग हेच आत्मनिर्भर भारताचे खरे चालक-प्रधानमंत्री            तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारताचा इंग्लंडवर १० गडी राखून विजय            भारतात व्यवसाय करणाऱ्या सर्व समाज माध्यमांना कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल - अमित शहा            नीरव मोदीबाबत भारताचे म्हणणे ब्रिटनमधल्या न्यायालयाकडून मान्य            वित्तीय कृती दलाद्वारे पाकिस्तानचे नाव करड्या यादीत कायम           

Dec 18, 2019
11:46AM

वस्तू आणि सेवा कर परताव्याचं आश्वासन केंद्र सरकार मोडणार नाही, अशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राज्यांना ग्वाही.

आकाशवाणी
वस्तू आणि सेवा कर परताव्याचं आश्वासन केंद्र सरकार मोडणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना दिली आहे. त्या काल व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे भारतीय आर्थिक मेळाव्याला संबोधित करत होत्या. करसंकलनात घट आल्यानं परताव्याची रक्कम द्यायला उशीर झाला, त्यात राज्यांनी काळजी करावी असं काही नाही.

नैसर्गिक आपत्तीमुळे तसंच उपभोक्त्यांकडून मागणी घटल्यानं कर संकलन कमी झालंय. ते वाढवण्यासाठी केंद्र तसंच प्रत्येक राज्याच्या महसूल विभागानं नेटानं प्रयत्न केले पाहिजेत, असं त्या म्हणाल्या. 

सरकार वस्तू आणि सेवा कराचे दर कमी करण्याचा विचार करत असल्याचं वृत्त त्यांनी फेटाळून लावलं. चुकीच्या मापन पद्धतीनं सोयिस्कर आकडेवारी आणि निष्कर्ष काढले जात असल्याच्या आरोपाबाबत त्या म्हणाल्या, की आकडेवारीची विश्वासार्हता सुधारण्यावर सरकार भर देत आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादन, चलन फुगवटा आणि रोजगार या घटकांकडे लक्ष दिलं जात आहे, असं त्यांनी सांगितलं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Feb 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.2 15.2
मुंबई 36.0 21.2
चेन्नई 32.2 20.4
कोलकाता 36.3 21.6
बेंगलुरू 33.0 17.4