महत्वाच्या घडामोडी
नव्या कृषी कायद्याला एक ते दी़ड वर्ष स्थगिती देण्याचा केंद्र सरकारचा मानस            राज्यात २६७ केंद्रांवर १८ हजार १६६ कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण            कापूस उत्पादक पणन महासंघाला १५०० कोटी रुपये कर्ज हमीला राज्यशासनाची मंजूरी            ७८ वर्षीय ज्यो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान            खरीप विपणन हंगाम खरेदी योजनेचा ८१ लाख शेतकऱ्यांना लाभ - केंद्र सरकार           

Dec 11, 2019
6:03PM

जीएसटी मोबदला आणि कर परताव्याची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी- उद्धव ठाकरे

आकाशवाणी
वस्तू आणि  सेवा कर (जीएसटी) मोबदला आणि कर परताव्याची रक्कम राज्याला लवकरात लवकर मिळावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्राद्वारे केली आहे.

केंद्र सरकारकडून राज्य शासनाला १५ हजार ५५८ कोटी ५ लाख रुपये कर परताव्यापोटी येणं बाकी असून हा परतावा कमी झाल्यामुळे राज्यातील विकास कामांवर परिणाम होत आहे, असंही या पत्रात म्हटलं आहे.

२०१९-२० च्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मिळणारा कर परतावा ४६ हजार ६३० कोटी ६६ लाख एवढा होता. मात्र ऑक्टोबर २०१९ पर्यंत राज्याला २० हजार २५४ कोटी ९२ लाख इतकीच रक्कम मिळाली. असंही मुख्यमंत्र्यांनी लिहीलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-21 Jan 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 18.3 7.4
मुंबई 32.0 18.0
चेन्नई 29.0 23.2
कोलकाता 28.0 14.6
बेंगलुरू 29.4 17.0