महत्वाच्या घडामोडी
राज्यसरकार तर्फे विरार दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर            विरार दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर            कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना            विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू            देशात कोरोनाबाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ प्रथमच ३ लाखाहून अधिक           

Nov 15, 2019
10:58AM

ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली रशिया, ब्राझील आणि चीनच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा

आकाशवाणी
ब्रासिलिया इथं सुरु असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रशिया, ब्राझील आणि चीनच्या अध्यक्षांच्या भेटी घेऊन द्विपक्षीय चर्चा केली.

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेत मोदी यांनी उभय देशांमधल्या संबंधाच्या वाढीबद्दल समाधान व्यक्त केलं. व्लादिवोत्सोक दौर्‍यानंतर द्विपक्षीय संबंधामधे झालेल्या प्रगतीचा उभय नेत्यांनी आढावा घेतला. २०२५ पर्यंत द्विपक्षीय व्यापार २५ अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट आधीच पूर्ण झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं.

ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्याशी झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमधल्या विविध क्षेत्रांमधल्या सहकार्याबाबत चर्चा झाली. दोन्ही देशांमधली धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत उभय नेत्यांमधे एकमत झालं. येत्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी बोल्सोनारो यांना प्रधानमंत्र्यांनी आमंत्रण दिलं, ते त्यांनी स्वीकारलं आहे.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही मोदी यांची बैठक झाली. त्यात भारत-चीन संबंधाच्या विविध पैलूंबाबत चर्चा झाली. चीनमधे पुढच्या वर्षी होणार्‍या तिसर्‍या अनौपचारिक बैठकीसाठी जिनपिंग यांनी मोदी यांना आमंत्रण दिलं. या बैठकीची तारीख आणि वेळ राजनैतिक पातळीवरुन निश्चित केली जाईल. व्यापार आणि गुंतवणूकविषयक चर्चा चालू ठेवण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.


   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-23 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 34.0 22.0
मुंबई 35.3 25.5
चेन्नई 34.3 28.5
कोलकाता 32.2 21.0
बेंगलुरू 31.0 25.2