चीनच्या आयात मालावरीलशुल्क मागे घेण्याबाबत आपली सहमती नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड़ ट्रम्प यांनीम्हटलं आहे. काल रात्री व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतघोषणा केली. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार युध्द संपुष्टात येण्याची चिन्हे धुसरझाली आहेत. गेल्या महीन्यात दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांतर्गत टप्प्याटप्प्यानंआयातमालावरील शुल्क मागे घेण्याबाबत सहमती झाल्याचा दावा चीननं केला होता. या पार्श्वभूमीवरट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. अमेरिका आणि चीननं द्वीपक्षीयव्यापारावर कोट्यावधि डॉलरचं आयात शुल्क आकारलं होतं. अमेरिकेन १५ डिसेंबरपासून चीनच्याआयात मालावर एक कोटी साठ अब्ज डॉलरचं आयात शुल्क निर्धारित केलं आहे. दरम्यान,चीनची अर्थव्यवस्था डळमळीतझाल्यानं चीन सरकारला आयात मालावरील शुल्काबाबत करार करायचा असल्याचं ट्रम्प यांनीम्हटलं आहे.