महत्वाच्या घडामोडी
देशातला शेअर बाजार आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा            ४३ मोबाईल ॲप्लिकेशन बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय            राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय नाही, नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये - राजेश टोपे            कोविड लसीचं वितरण आणि लसीकरण या संदर्भात कृती दलाची स्थापना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे           

Nov 06, 2019
1:51PM

कांद्याची आयात प्रक्रिया सुलभ होण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक सुविधा पुरवणार

आकाशवाणी
इतर देशांमधून कांद्याचा लवकर आणि सुरळीत पुरवठा व्हावा तसंच आयात प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी केंद्र सरकार आवश्यक सुविधा पुरवणार आहे. अफगाणिस्तान, इजिप्त, तुर्कस्तान आणि इराणमधून भारताला कांद्याचा पुरवठा व्हावा, यासाठी तिथल्या भारतीय राजनैतिक अधिका-यांना सूचना दिल्या जातील.

कांद्याचे दर आणि उपलब्धता यांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या आंतरमंत्रालयीन समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. या निर्णयामुळे भारतात 80 कंटेनर्सची निर्यात ताबडतोब होईल, तसंच 100 कंटेनर्स भारताकडे वळवले जाण्याची अपेक्षा आहे.

मुख्यतः पाऊस आणि दोन वेळा आलेल्या चक्रीवादळामुळे कांद्याचा पुरवठा विस्कळीत झाला असून येत्या काही दिवसात त्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 25.0 07.0
मुंबई 32.0 20.0
चेन्नई 312.0 23.0
कोलकाता 28.0 15.0
बेंगलुरू 26.0 17.0