महत्वाच्या घडामोडी
राज्यात विविध ठिकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचं आश्वासन            छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद            वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु            मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार           

Oct 19, 2019
9:52AM

पीएमसी बँक घोटाळ्यातल्या तीन आरोपींना २३ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

आकाशवाणी
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातल्या तीन आरोपींना मुंबईतल्या न्यायालयानं, येत्या 23 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. एच.डी.आय.एलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवान, त्याचा मुलगा सारंग, आणि पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वर्यम सिंग या तिघांना काल महानगर दंडाधिकारी एस जी शेख यांच्यापुढं हजर करण्यात आलं.

त्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं मनीलाँड्रिंग कायद्याखाली वाधवान पिता-पुत्रांना ताब्यात घेण्यासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानं त्यांना आवश्यक औपचारिकता पूर्ण करायला सांगत कामकाज तहकूब केलं, आणि पुढची तारीख दिली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0