A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Jan 21 2021 2:44PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
७८ वर्षीय ज्यो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान
          
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून नव्या अमेरिकी नेतृत्वाचे स्वागत
          
राज्यात कोरोना लसीकरणाला मंगळवारच्या तुलनेत बुधवारी समाधानकारक प्रतिसाद
          
कृषी कायद्यांवरील चर्चा पूर्ण होईपर्यंत दीड वर्षे स्थगिती देण्याचा सरकारचा प्रस्ताव
          
खरीप विपणन हंगाम खरेदी योजनेचा ८१ लाख शेतकऱ्यांना लाभ - केंद्र सरकार
          
Oct 13, 2019
,
9:26AM
भारत आणि चीन यांच्यामधला परस्पर व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी नवं तंत्र अंमलात आणण्याबाबत उभय देशांचा निर्णय
आकाशवाणी
भारत आणि चीननं परस्पर व्यापार आणि गुंतवणूकीत वाढ करण्यासाठी नविन तंत्र विकसित करायचं ठरवलं आहे. भारताचे अर्थमंत्री आणि चीनचे उप-प्रधानमंत्री यांच्यात हे तंत्र विकसित करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली आहे. ते आज दुपारी दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अनौपचारिक शिखर संमेलनानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते.
भारत-चीन संबंधांचा नवा अध्याय सुरु करण्याच्या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातल्या शिखर बैठकीचा आज समारोप झाला. तमिळनाडूत ममल्लपुरम इथं झालेल्या चर्चेच्या दुसऱ्या दिवशी आज उभय नेत्यांनी अनौपचारिक बातचीत केली. परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यावेळी उपस्थित होते.
भारत आणि चीन प्राचीन काळापासून जगातले आर्थिकदृष्ट्या प्रगत देश आहेत, असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. वुहान जाहीरनाम्याच्या पार्श्वभूमीवर उभय देशांमधे वाढत्या संवादाबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. आजच्या चेन्नई व्हिजनच्या माध्यमातून चीनबरोबरच्या सहकार्याचं नवं युग सुरु झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल जिनपिंग यांना ममल्लपुरम इथल्या ऐतिहासिक वास्तूंची सफर घडवली. चीनबरोबर संबंध दृढ करणा-या पल्लव राजांच्या काळात या वास्तू उभारण्यात आल्या होत्या. स्थानिक कारागिरांच्या कौशल्यांची प्रात्यक्षिकं दोघांनी पाहिली. जिनपिंग यांचं चित्र विणलेली शाल तसंच प्रसिद्ध कांचीपुरम रेशमी वस्त्रं प्रधानमंत्र्यांनी पाहुण्यांना नजर केलं.
संबंधित बातम्या
आयुष्यमान भारत योजना म्हणजे नव्या भारताच्या जडणघडणीसाठी उचलेलं क्रांतिकारक पाऊल
भारताच्या भेटीवर आलेल्या बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसिना आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार
सिंगापूरचे उपप्रधानमंत्री आणि अर्थमंत्री हेंग स्वी कीट यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा घेणार सभा
पोलीस दल नागरिकस्नेही करण्यासाठी काम केलं पाहिजे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
प्रचार सभा - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करू : देवेंद्र फडणवीस
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आजपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांना आदरांजली वाहिली
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात आज अनौपचारिक चर्चा, उद्या अनौपचारिक शिखर बैठक
नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यातल्या अनौपचारिक शिखर बैठकीचा आज दुसरा दिवस
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-21 Jan 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
18.3
7.4
मुंबई
32.0
18.0
चेन्नई
29.0
23.2
कोलकाता
28.0
14.6
बेंगलुरू
29.4
17.0