महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेमुळे देशातल्या गरीब नागरिकांना औषधांवरच्या मोठ्या खर्चातून दिलासा मिळाला असल्याचं प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन            देशात कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या २ कोटीच्या वर            नाशिक इथं होणारं ९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित            मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतले जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन            राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण           

Jun 19, 2020
8:06PM

राज्यातील एकूण रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक बरे होऊन गेले घरी

आकाशवाणी

रायगड जिल्हय़ात कोरोना बाधित रूग्णाची संख्या ८४ ने वाढून एकूण रूग्णाची संख्या २०६७ झाली आहे. आज पनवेल महानगर पालिका हद्दीतील दोन रूग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत जिल्हय़ात ९१ मृत्यू कोरोना मुळे झाले आहेत. आतापर्यंत जिल्हय़ात  १४५१ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात काल आणखी दहा नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ४५९ झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातले ३४३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७४ पूर्णांक ७२ शतांश टक्के झालं आहे. तर आत्तापर्यंत १७ जणांचा या आजारानं मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्ह्यात काल २० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडलं. जिल्ह्यात काल १८ नव्या रुग्णांचीही नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातल्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ५९३ तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७९१ झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ३८ जण कोरोनाच्या संसर्गामुळे दगावले असून, सध्या १५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

नांदेड जिल्ह्यात काल आणखी १० जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९६ झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातले आज १८१ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १०२ रूग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान या आजारानं आत्तापर्यंत १३ रूग्ण दगावले आहेत.
नाशिकमध्ये काल ११६ जणांना कोरोनाची लागण झाल्याची स्पष्ट झालं. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे तिथल्या कोरोनाबाधितांची संख्या ९७७ तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ४८ झाली आहे. 

जालना जिल्ह्यात आज सकाळी आणखी २६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातली कोरोनाबाधितांची संख्या ३५० झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यातले २२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या ११९ जणांवर उपचार सुरू आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात आज १३ तर काल एक रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २३३ झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात काल ७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचीही नोंद झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी आणखी ९१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातली रुग्णसंख्या ३ हजार २०७ वर पोहोचली आहे. यापैकी १ हजार ७५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १७० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार २८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी ३ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ११४ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ३९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

नांदेड जिल्ह्यात आज एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे जिल्ह्यातली कोरोनाबाधितांची संख्या २९७ झाली आहे. यापैकी १८६ रूग्ण बरे झाले आहेत तर १३ रूग्णांचा या आजारानं मृत्यू झाला आहे.  कोरोनाविषाणू बाधेमुळे मृत्यू पावले आहेत. सध्या जिल्ह्यात ९८ रूग्णांवर उपचार सुरु आहेत.
बुलडाणा जिल्हयात आज ६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४८ झाली आहे. यापैकी ९५ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं घरी परतले आहेत, तर सध्या ४८ जणांवर उपचार सुरु आहेत.  

गडचिरोली जिल्ह्यातही आज एका कोरोनाबाधित तरुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ५४ झाली आहे. यापैकी आत्तापर्यंत ४२ जण बरे झाली असून, जिल्ह्यात सध्या केवळ ११ जणांवर उपचार सुरु आहेत. 
अमरावतीत आज आठ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले. आत्तापर्यंत जिल्ह्यातले २६२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, सध्या जिल्ह्यात १११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यातल्या कोविड सेंटरमधे दाखल असलेल्या रुग्णांना योग्य उपचार देता यावेत, यासाठी तिथे कार्यरत असलेल्या सर्व डॉक्टरांनी दररोज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सचा परस्परांशी संवाद साधावा आणि रुग्णांच्या उपचारांविषयी सल्लामसलत करावी अशा सूचना जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या आहेत.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-07 Mar 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 31.5 14.4
मुंबई 32.8 19.8
चेन्नई 32.2 24.8
कोलकाता 36.2 20.8
बेंगलुरू 35.9 17.5