महत्वाच्या घडामोडी
देशातला शेअर बाजार आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा            ४३ मोबाईल ॲप्लिकेशन बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय            राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय नाही, नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये - राजेश टोपे            कोविड लसीचं वितरण आणि लसीकरण या संदर्भात कृती दलाची स्थापना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे           

May 05, 2020
7:40PM

ठाण्यातही १००० बेडचं रुग्णालय उभारण्याचे आदेश

आकाशवाणी

कोरोनाशी लढा देण्यासाठी मुंबईत वांद्रे-कुर्ला काँप्लेक्समध्ये उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या धर्तीवर ठाण्यातही येत्या तीन आठवड्यांत १००० बेडचं रुग्णालय उभारण्याचे आदेश राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेला दिले. ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर या तात्पुरत्या रुग्णालयात करण्यात येणार आहे.

विप्रो कंपनीने पुण्यात ४५० खाटांचे विशेष कोविड रुग्णालय स्थापन करणार आहे. यासंबंधी राज्य सरकारसोबत एक करार कंपनीने केला आहे. पुण्याच्या हिंजेवाडी इथल्या माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये हे रुग्णालय सुरु करण्यात येईल.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी रूग्णालयामध्ये वाढ केली जाणार आहे. वाशी इथलं सिडको प्रदर्शनी केंद्रात कोविड केअर सेंटर, घणसोली इथल्या रिलायन्स आयटी पार्क मधील मेडिकल सेंटरमध्ये कोविड केअर सेंटर, तर नेरूळ इथल्या तेरणा वैद्यकीय रूग्णालयात १०० खाटांचे डेडिकेटेड कोविड  रूग्णालय सुरू करण्यात येणार आहे. सध्या वाशी इथल्या महापालिकेच्या सर्वसाधारण रूग्णालयात १३० खाटांचे डेडिकेटेड कोविड रूग्णालय सुरू आहे.  

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 25.0 07.0
मुंबई 32.0 20.0
चेन्नई 312.0 23.0
कोलकाता 28.0 15.0
बेंगलुरू 26.0 17.0