महत्वाच्या घडामोडी
राज्यात सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द            मराठा आरक्षणाबाबत तातडीचा निर्णय प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतींनीच घ्यावा, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विनंती            आदिवासींसाठी मोहफुलांवरील निर्बंध हटवण्याचा राज्य सरकारचा निर्णय            कोरोना संबंधित आरोग्य सुविधांसाठी भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दराने कर्ज उपलब्ध करून देणार            देशात आतापर्यंत १ कोटी ६९ लाखापेक्षा जास्त रुग्ण झाले बरे           

Mar 02, 2020
3:25PM

कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावानं जगभरात ३ हजार लोकांचा मृत्यू

आकाशवाणी
कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावानं जगभरात आतापर्यंत तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे, तर चीनमध्ये या आजारानं आतापर्यंत दोन हजार ९१२ जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या वर्षी चीनमध्ये उद्रेक झालेला हा आजार आता ६० हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये कोविड-१९ या आजाराचा पहिला रुग्ण गेल्या आठवड्यात सापडला आहे. मात्र इटली आणि युरोपमध्ये याचा प्रसार झपाट्याने झाला.

कोरोना विषाणूचा संसर्ग हा विशेषकरुन ६० वर्षे वयाच्या पुढच्या लोकांना होत आहे, ज्यांना वयोमानाप्रमाणे इतर आजार ही होतात, असं जागतिक आरोग्य संघटनेनं काल म्हटलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-05 May 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40 24
मुंबई 35 26
चेन्नई 36 27
कोलकाता 32 23
बेंगलुरू 32 24