महत्वाच्या घडामोडी
देशातला शेअर बाजार आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा            ४३ मोबाईल ॲप्लिकेशन बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय            राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय नाही, नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये - राजेश टोपे            कोविड लसीचं वितरण आणि लसीकरण या संदर्भात कृती दलाची स्थापना - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे           

Mar 02, 2020
8:43AM

चीन बाहेर ६ हजारांहून अधिकांना कोविड-१९ आजाराची लागण

आकाशवाणी

चीन बाहेर सहा हजारांहून अधिक जणांना कोविड१९ या आजाराची लागण झाली असून, जगभरात या आजाराचा संसर्ग झालेल्यांची संख्या ८५ हजार ४०० हून अधिक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे.

या आजारामुळे आतापर्यंत चीन बाहेरचे ८६ रुग्ण दगावले असून, त्यातले १९ जण गेल्या चोवीस तासांमध्ये दगावले असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे.

गेल्या २४ तासात या आजाराची लागण झालेले तेराशे नवे रुग्ण आढळून आले आहेत, त्यात मेक्सिको आणि सॅन मारिना या देशांमध्ये आढळलेल्या पहिल्या रुग्णांचाही समावेश असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. आतापर्यंत चीन शिवाय इतर ५३ देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 25.0 07.0
मुंबई 32.0 20.0
चेन्नई 312.0 23.0
कोलकाता 28.0 15.0
बेंगलुरू 26.0 17.0