महत्वाच्या घडामोडी
राज्यात २६७ केंद्रांवर १८ हजार १६६ कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण            कापूस उत्पादक पणन महासंघाला १५०० कोटी रुपये कर्ज हमीला राज्यशासनाची मंजूरी            ७८ वर्षीय ज्यो बायडन अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान            कृषी कायद्यांवरील चर्चा पूर्ण होईपर्यंत दीड वर्षे स्थगिती देण्याचा सरकारचा प्रस्ताव            खरीप विपणन हंगाम खरेदी योजनेचा ८१ लाख शेतकऱ्यांना लाभ - केंद्र सरकार           

Feb 17, 2020
6:12PM

माझगाव इथल्या जीएसटी भवनला आग

आकाशवाणी
मुंबईच्या माझगाव येथील जीएसटी भवनाला आज दुपारी भीषण आग लागली. या आगीची चौकशी केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

घटनास्थळाला भेट दिल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. माझगाव येथे विक्रीकर भवन आहे. काही वर्षांपूर्वी ते वॅट भवन होते, आता जीएसटी भवन म्हणून ओळखले जाते.

तळ अधिक नऊ मजली असलेल्या इमारतीच्या नवव्या मजल्यावर आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले मात्र उंच शिड्या नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अडचणीचे झाले होते.

अग्निशमन दलाच्या उंच शिड्यांच्या गाड्या आल्यावर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग शॉक सर्किटने लागल्याचे समजते.

आगीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार, स्थानिक आमदार यामिनी जाधव, पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी भेट दिली.

दुपारी सव्वातीन च्या सुमारास आग आटोक्यात आली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-21 Jan 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 18.3 7.4
मुंबई 32.0 18.0
चेन्नई 29.0 23.2
कोलकाता 28.0 14.6
बेंगलुरू 29.4 17.0