महत्वाच्या घडामोडी
वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु            मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार            राज्यात विविध ठीकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा            वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध           

Feb 02, 2020
7:40PM

कोरोना विषाणूबाधित दुसरा रुग्ण केरळात आढळला

आकाशवाणी

नोवेल कोरोना विषाणूबाधित दुसरा रुग्ण केरळात आढळला आहे. त्याला अलापूझा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केलं असून विशेष देखरेखीखाली ठेवल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

हा रुग्ण नुकताच चीनमधून भारतात परतला होता. आरोग्य राज्यमंत्री के. के. शैलजा यांनी कोल्लम इथं वार्ताहरांना सांगितलं की, रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याचा सविस्तर अहवाल झाल्यानंतरच विषाणू संसर्गाबाबत माहिती मिळेल.

केरळात सर्वत्र प्रतिबंधक पावलं उचलली असून लोकानां दक्ष रहायला सांगितल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. चीन तसंच इतर संसर्गजन्य भागातून परतलेल्यांनी नियंत्रण कक्षात जाऊन वैद्यकीय तपासणी करुन घेण्याची सूचना केरळ सरकारनं दिली आहे. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0