महत्वाच्या घडामोडी
जागतिक कोविड-१९ संकटात मृत्यूदर नियंत्रित राखण्यात भारताला मोठे यश            राज्यात काल ४ हजार ३६२ रुग्ण कोरोनामुक्त            प्रत्येकाशी प्रेमपूर्वक आदराने वागण्याची गुरु नानकदेव यांची शिकवण आजच्या काळात खूप महत्त्वाची - मुख्यमंत्री            महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या            केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण साधणारे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी           

Jan 25, 2020
6:51PM

'कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी

आकाशवाणी
'कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीनं खबरदारीचा उपाय घेण्यात आला आहे.  मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची थर्मल स्कॅनरद्वारे  तपासणी केली जात आहे. गेल्या सात दिवसांत १ हजार ७८९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ६ जण महाराष्ट्रातील होते.

त्यासंदर्भात  मुंबईतील दोन प्रवाशांना आजाराची लक्षणं आढळल्यानं त्यांना कस्तुरबा रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

कोरोना विषाणूंचे नमुने तपासण्यासाठी महाराष्ट्रात पुणे येथे असलेली राष्ट्रीय संसर्गजन्य रोग संशोधन संस्था सज्ज आहे, तसंच आवश्यकता असेल तर, देशातल्या आणखी दहा तपासणी केंद्रांमध्ये या विषाणूंचे नमुने तपासले जातील असंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-30 Nov 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 26.4 6.9
मुंबई 33.3 22.0
चेन्नई 30.6 24.4
कोलकाता 28.0 16.0
बेंगलुरू 26.0 18.0