महत्वाच्या घडामोडी
जागतिक कोविड-१९ संकटात मृत्यूदर नियंत्रित राखण्यात भारताला मोठे यश            राज्यात काल ४ हजार ३६२ रुग्ण कोरोनामुक्त            प्रत्येकाशी प्रेमपूर्वक आदराने वागण्याची गुरु नानकदेव यांची शिकवण आजच्या काळात खूप महत्त्वाची - मुख्यमंत्री            महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या            केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण साधणारे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी           

Jan 24, 2020
2:11PM

कोरोना विषाणूंमुळे २५ जणांचा मृत्यु

आकाशवाणी

कोरोना विषाणूंमुळे २५ जणांचा मृत्यु,तर ८३० जणांना या विषाणूंची लागण झाल्याची कबुली चीनच्या आरोग्य विभागानं दिली आहे. २९ प्रांतीय विभागात या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याचं सांगितलं जात आहे. या विभागात १ हजार ७२ नवीन लोकांना या विषाणूंची बाधा झाल्याचा संशय  आहे, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

२५ पैकी २४ मृत्यू  चीनच्या हुबेई प्रांतात झाले आहेत. या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून चीनच्या ५ शहरांमध्ये प्रवास बंदी करण्यात आली आहे. थायलंडमध्ये तीन जणांना या विषाणूंची बढाझाली होती, पैकी दोन रुग्ण बरे झाले आहेत. कोरिया, अमेरिका आणि सिंगापूर इथं प्रत्येकी एका रुग्णाला विषाणू बाधा झाली आहे, तर व्हिएतनाम इथं दोन रुग्ण आढळले आहेत.

चीनमध्ये ९ हजार ५०७ रुग्णांपैकी ८ हजार ४२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर  हजार ८७ रुग्णांना उपचारा नंतर घरी पाठवलं आहे. दरम्यान, या समस्येला  इतक्या लवकर आरोग्य आणीबाणी जाहीर करणं अगतिकता होईल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.   

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-30 Nov 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 26.4 6.9
मुंबई 33.3 22.0
चेन्नई 30.6 24.4
कोलकाता 28.0 16.0
बेंगलुरू 26.0 18.0